ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुण्यात शासकीय इतमामात त्यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. याबाबत नाम फाऊंडेशनचे गणेश थोरात यांनी माहिती दिली
नाना पाटेकर यांची इच्छा अपूर्णच राहिली-गणेश थोरात
नाना नेहमी म्हणायचे की माझं उद्या काही बरंवाईट झालं तर मी मातीतला माणूस आहे या मातीतच अंत्यविधी व्हावा. सागाची काही लाकडं त्यांनी बाजूला काढून ठेवली होती. ते म्हणायचे अंत्यविधीला ही लाकडं वापरा, ते झाड कधी तोडायचे नाहीत. माझं काल नाना पाटेकरांशी एका मुलीच्या अॅडमिशनसाठी बोलणं झालं होतं. नाना पाटेकर हे विदर्भ आणि मराठवाड्यात जाणार होते, त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटायचं होतं जो दुष्काळ पडला आहे आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांची जबाबदारी मी घेतो जे काही लागेल ते करतो पण आत्महत्या करू नका हे नाना जाऊन शेतकऱ्यांना सांगणार होते. पण त्यांची इच्छा अपूर्णच राहिली असं थोरात यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नाना पाटेकर यांचं झाडांवरही खूप प्रेम होतं-थोरात
नाना पाटेकर शेतात यायचे तेव्हा चप्पल घालायचे नाहीत. ते म्हणायचे काळी माती म्हणजे माझी आई आहे. आईवर चप्पल घालून चालणं पटत नाही. त्यामुळे ते शेतात चप्पल घालायचे नाहीत. जमिनीतून आलेला माणूस होता, त्यांचं झाडांवरही खूप प्रेम होतं. फणसाचं झाड त्यांना खूप आवडत होतं. झाडांची मुलांसारखी निगा राखत होते. नाना म्हणायचे मी मातीतून आलो आहे, मला शेतकऱ्यांसारखंच जगायचं आहे असं मला कायमच म्हणायचे. ते म्हणायचे आपल्या घरात चांगलं काही केलं तर शेजारच्यांना आपण वाटीभर नेऊन द्यायचो. असं शहरांमध्ये का घडत नाही? इथे भगतवाडीमध्ये काही घरांना आग लागली होती. लगेच नाना पाटेकर त्या गावात लोकांना भेटायला गेले होते. शेतकऱ्यांना सांगितलं की मी तुमची घरं बांधून देतो, काळजी करू नका आणि ती घरं त्यांनी बांधून दिली. ते जिथे असतील तिथे त्यांचं सामाजिक काम सुरू असायचं असंही त्यांनी सांगितलं.
नाना पाटेकरांच्या घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांना मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णलायातून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
