Sanjay Gaikwad offers Rs11 lakh for chopping off’ Rahul Gandhi’s Tongue : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यावरून राहुल गांधींवर टीका होत असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदाराने केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटावर टीका होऊ लागली आहे. “राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचं बक्षीस देऊ”, अशी प्रक्षोभक घोषणा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. गायकवाडांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस त्यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून गायकवाड व राज्यातील महायुती सरकारचा निषेध नोंदवला आहे.

नाना पटोले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आमदार संजय गायकवाड यांचा एकेरी उल्लेख करत म्हटलं आहे की “एकनाथ शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा. ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्यानं राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात तसं गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे”.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Chhagan Bhujbal On Mahayuti
Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…

संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पटोले म्हणाले, “भाजपाचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो. भाजपाचा दुसरा नेता व मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतो. यावर नरेंद्र मोदी व अमित शाह मूग गिळून गप्प बसतात. आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातला गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. यावर एकनाथ शिंदे व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली पाहिजे. या राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाही मानता की नाही?”

Nana Patole X post
नाना पटोले यांची एक्सवरील पोस्ट

हे ही वाचा >> Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचं बाळासाहेब थोरातांना आव्हान? विधानसभा लढवण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “संगमनेरमधून…”

अन्यथा जनता निवडणुकीत या लोकांना घरचा रस्ता दाखवेल : नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “संजय गायकवाडच्या तोंडाला आवर घाला नाहीतर, पंजा (काँग्रेसचं निवडणूक चिन्ह) काय करेल हे कळणारही नाही. संविधान व राहुल गांधींबाबत बोलायची तुम्ही लायकी आहे का? ते आधी पाहा. सत्तेच्या माजात काहीही बरळू नका. नाहीतर निवडणुकीत घरचा रस्ता पक्का समजा. जनता यांना धडा शिकवणारच. मतदार घरचा रस्ता दाखवणारच. संजय गायकवाडांना अटक करा. या गुंडशाही सरकारचा जाहीर निषेध”.