“पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपाने महागाईच्या गर्तेत लोटले आहे. निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती, पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भारतीय जनता पार्टीने जनतेला महागाईची भेट दिली आहे.” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

“ निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले. आधी घाऊक डिझेलची दरवाढ करुन महागाई वाढवली, आता एका दिवसातच पेट्रोल-डिझेलचे भाव ८० पैशांनी वाढवले, तर घरगुती गॅसचा ५० रुपयांनी भडका उडाला आहे. ” असं नाना पटोले ट्वीटद्वारे म्हणाले आहेत. याचबरोबर त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्य तेलाचे दर वाढत आहेत. आज एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये, तर पेट्रोल व डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. आधीच पेट्रोल, डिझेल प्रति लिटरचा दर शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गॅस सिलिंडर एक हजाराच्या जवळ पोहचला आहे. रशियाकडून कच्चे तेल सवलतीच्या किमतीत घेऊनही इंधन दरवाढ केली आहे. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादन, मॉल्स यांच्यासाठीचे डिझेल २५ रुपये प्रती लिटरने महाग केले आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटकाही शेवटी सामान्य माणसांनाच बसणार आहे. महागाईने मागील सात महिन्यातील उच्चांक गाठला आहे.”

मोफत गॅस तर सोडाच उलट आहे त्याच गॅसची किंमत वाढवली आहे –

तसेच, “एकीकडे लोकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र वाढत असून, सामान्य जनतेवर हा दुहेरी मार आहे. निवडणुकीच्या प्रचारात एलपीजी गॅस मोफत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. पण निवडणुका होताच मोफत गॅस तर सोडाच उलट आहे त्याच गॅसची किंमत वाढवली आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होताच पट्रोल, डिझेलचे दर कमी केले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होताच महागाईची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे नेते महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मूग मिळून गप्प बसतात आणि हिजाब, हिंदू- मुस्लीम, पाकिस्तान, जीना, या प्रश्नावर आकांडतांडव करून जनतेचे लक्ष्य मुख्य मुद्द्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.”, अशा शब्दांमध्ये नाना पटोले यांनी टीका केली आहे.