काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा पुनरुच्चार करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. यात भाषणावेळी नाना पटोले यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. पंकजा मुंडे महिला व बालविकास मंत्री असताना त्यांच्यावर चिक्की खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा उल्लेख करत नाना पटोलेंनी मिश्कील भाष्य केलं.

लोणावळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले,”लोणावळ्याची चिक्की जगभर प्रसिद्ध आहे. मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस झाली. मात्र, आता काय हाल झाले आहे ते बघा तुम्हीच,” असा टोला त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव न घेता लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, “उभ्या देशाला ज्या काँग्रेस विचारानं मोठं केलं, मुख्य प्रवाहात आणलं. त्या काँग्रेसचे गोडवे सांगण्यामध्ये आपण सर्व कमी पडलो. मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. नरेंद्र मोदींच्या सरकारला सात वर्षे झाली आहेत. या सरकारने  कुणाला जिवंत ठेवलं नाही सर्वाना मारून टाकलं”, अशी टीका पटोले यांनी मोदी सरकारवर केली.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

हेही वाचा- सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत’, असा जिल्हाध्यक्षांच्या विधानाचा धागा पकडत नाना पटोले म्हणाले, “निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत, त्याही पुणे जिल्ह्यात. एका बदमाश व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला ही लढाई लढायची आहे”, असं आवाहन पटोले यांनी केलं.

हेही वाचा- “नानाजी काय तुमची अवस्था?… ना सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला”

“मोठी जहाज बुडण्याची जास्त भीती असते. लहान होडीला नसते. ती कशीबशी ती निघून जाते. मोठी जहाज लवकर डुबतात. माझा इशारा तुम्ही समजून घ्या… मी पुण्याच्या दौऱ्याला आलो की मोठ्या जहाजाला खूप त्रास होतो. दुष्मनाकडे लक्ष जास्त देण्यापेक्षा आपण आपल्या घराकडे लक्ष देऊन माणसं सांभाळून प्रत्येकाला कामाला लावा”, असा सूचक इशारा पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. “महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायला मोठा काळ लागणार नाही. जे काही पाहतोय महाराष्ट्रात फक्त वातावरण निर्मिती मी करून देईल. बूथ प्रॉपर बनवा. महाराष्ट्रात सत्ता आणायची हा मानस केला आहे”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं.