राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. तसेच सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवावा, असे निर्देशही निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीकडून सातत्याने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं. मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो. तसेच त्यांना धन्यवाद देतो. मात्र, अजूनही एक प्रश्न अनुत्तरीत आहे, तो म्हणजे, निवडणूक जाहीर होताच झारखंड आणि पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची बदली झाली. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी इतके दिवस का लागले? याचं उत्तर मिळालं पाहिजे, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. पण आता त्या निवडणूक प्रक्रियेत राहायला नको, याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदावर बसून भाजपासाठी काम करत होत्या. विरोधकांचे फोन टॅप करण्याचे काम त्यांनी केलं. त्यांच्याविरोधात आम्ही अनेकदा तक्रारही केली होती. मात्र, महायुती सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यांना पोलीस महासंचालक पदावर बसवलं होतं, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.