पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आम्ही पुण्याची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केलं आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर जाहीरपणे दावा करत अजित पवार म्हणाले, ज्या पक्षाची ताकद जास्त त्यालाच ही जागा मिळावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आघाडीत पुण्याची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती. त्यामुळे आताही काँग्रेचाच या जागेवर दावा आहे. त्यामुळे अजित पवारांनी या जागेवर दावा केल्यावर यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ज्याचं मेरिट त्याला जागा मिळायला हवी. २०१४, २०१९ आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. आता निवडणुका होणार आहे. या निवडणुकीतली परिस्थिती ओळखूनच निर्णय घेतला जाईल. मेरिटच्या आधारावर हा निर्णय घेऊ.

लोकसभेच्या जागांवर मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जावा हेच सर्वांच मत आहे. काँग्रेसचं मेरिट असेल तर काँग्रेस बिलकूल या जागेवर दावा करेल. पुण्यात कांग्रेसचं मेरिट आहे. विधानसभा आणि लोकसभेत जी परिस्थिती असेल त्यावर निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, अजित पवार असं म्हणाले होते की, “पुण्यात राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेत अधिक आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते.” यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, आपण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल बोलत नाही. तसं असेल तर प्रत्येक भागात वेगवेगळ्या गोष्टी होतील. पुणे लोकसभा काँग्रेसलाच मिळायला हवी कारण पुण्यात कांग्रेसचं मेरिट आहे.

ण्याची पोटनिवडणूक लागणार असल्याचे मला समजले आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असल्याने पोटनिवडणूक लागणार नाही, असे वाटत होते. पण बहुतेक गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी माहिती आहे. आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. खासगीमध्ये रवींद्र धंगेकरांनापण विचारा. त्यांना निवडून आणण्याकरिता सगळ्या आघाडीच्या पक्षांनी सहकार्य केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole says congress has merit in pune lok sabha on ajit pawar statement asc
First published on: 29-05-2023 at 13:48 IST