Nana Patole महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीच्या ४७ जागा येऊ शकल्या आहेत. दरम्या विरोधक हे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी महायुतीने ७६ लाख मतं मिळवली कशी काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

शरद पवारांनीही संख्या दाखवली पण त्यांना देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला आकडे दाखवत आमचे आमदार कमी कसे आणि सत्ताधारी आमदार कमी मतं मिळून जास्त कसे काय? हा प्रश्न विचारला. त्यावर त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी गणित मांडूनच उत्तर दिलं. आता नाना पटोले ( Nana Patole ) यांनी महायुतीचं सरकार कसं आलं हा लोकांनाही पडलेला प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Mumbai ravi raja
मुंबई : भांडवली खर्चावरून पालिकेवर आरोप, कंत्राटदारांसाठी तिजोरी खुली केल्याचा रवी राजा यांचा आरोप
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा

नाना पटोले काय म्हणाले?

खरं तर एकट्या मारकडवाडीचाच विषय नाही. प्रत्येक गावात हा विषय निर्माण आहे. आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं आणि मतातलं नाही. हे सरकार कसं आलं याचाच लोकांना प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसभांची प्रक्रिया सुरु झाली आहे. याची दखल मुख्यमंत्री कशी काय घेणार? निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणं आणि अशा पद्धतीने असंतोष समोर येणं याची दखल न्यायालयाने घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं नाना पटोले ( Nana Patole ) यांनी म्हटलं आहे.

हे सरकार जनतेच्या मनातलं नाही-पटोले

मॉक पोलिंगचा दृष्टीकोन घेऊन सध्या लोक काम करत आहेत. जनतेच्या भावना अशा आहेत की हे सरकार जनतेच्या मनातलं नाही. आमची मतं चोरली गेली आहेत. रात्रीतून ७६ लाख मतं वाढली आहेत तिथेच हा सगळा खेळ दिसून आला. जनभावना मांडण्यासाठी हे सभागृह आहे. जनभावना मांडण्याचं काम आम्ही शनिवारी केलं. आमची लढाई विधानसभेतही लढू आणि रस्त्यावरही लढू. प्रतीकात्मक निषेध नोंदवत आम्ही शनिवारी आमदारकीची शपथ घेतली नव्हती. आज आम्ही सगळ्या आमदारांनी मात्र शपथ घेतली आहे. माझं मत हे माझा अधिकार आहे. मतदान केल्यानंतर आपला काही अधिकार उरतो की नाही? शेतकरी पुन्हा सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या हे सरकार मान्य करणार की नाही? सरकार जनभावनेचा आदर करणार की नाही? देशात बेरोजगारी वाढली आहे. नोकरी नसणाऱ्या तरुणांनीही मोर्चे काढले त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. एकदा मतदान केलं की तुमचा अधिकार नाही असंच सरकार वागतं आहे. असं नाना पटोले यांनी ( Nana Patole ) म्हटलं आहे.

Story img Loader