Nana Patole on BJP at Akola West Assembly constituency : अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल बोलताना पटोले यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मन्नन खान यांच्या प्रचारसभेत पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी समुदायातील लोकांना उद्देशून केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. नाना पटोले यांनी “भाजपाला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे”, असं वक्तव्य केलं होतं.

नाना पटोले म्हणाले, इथे ओबीसी समुदायातील लोक देखील बसले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की अकोला जिल्ह्यातील ओबीसी समुदायातील लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहेत का? कारण हेच लोक तुम्हाला कुत्रा बोलतात. त्यामुळे आता भाजपाला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. यांना इतकी मस्ती आली आहे की हे आता स्वतःला देव संबोधू लागले आहेत”.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे ही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय? भाजपाची उबाठावर टीका

पटोलेंची फडणवीसांवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना पूर्वीपासून लोक देवेंद्र फडणवीस याच नावाने ओळखतात. मला सर्वजण नानाभाऊ म्हणतात. आधी म्हणत होते, आताही म्हणतात आणि पुढेही म्हणतील. तुम्ही सर्वजण मला नानाभाऊ या नावानेच हाक मारता. फडणवीसांना सगळेजण देवेंद्र फडणवीस अशी हाक मारायचे. मात्र, आता त्यांनी स्वतःचं नाव बदललं आहे. ते स्वतःला देवा भाऊ असं संबोधू लागले आहेत. पुढील काही दिवसांत ते त्यांच्या नावापुढचा भाऊ हा शब्द काढतील. त्यानंतर काय राहील?” यावर सर्वांनी ‘देवा’ असं उत्तर दिलं. त्यावर नाना पटोले म्हणाले, “एक विश्वगुरू दिल्लीमध्ये बसले आहेत, दुसरे महाराष्ट्रात तयार होत आहेत”.

दरम्यान, रविवारी (१० नोव्हेंबर) पटोले यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलं की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील का? त्यावर पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस कसे काय मुख्यमंत्री होतील कारण ते निवडून येणार नाहीत तसंच त्यांचा पक्षही निवडून येणार नाही. मग ते कसे काय मुख्यमंत्री होतील?”

हे ही वाचा >> Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

मोदींचं ते वक्तव्य लोकशाहीवरील कलंक : पटोले

“नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात ‘एक है, तो सेफ है’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं हा लोकशाहीला एक प्रकारचा कलंक आहे.

Story img Loader