देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या देखील पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. पुढील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार असून १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. यानंतर १७ दिवसांनी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.

Akola Lok Sabha constituency, MLA s Reputations at Stake , vidhan saba constituency, votes will Decisive, mp s Election, bjp, vanchit bahujan aghadi, congress, lok sabha 2024, election 2024,
अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांची कसोटी, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक
Chandrapur, new voters,
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत नवमतदार, महिला मतदारांची भूमिका निर्णायक

देगलूर विधानसभा मतदारसंघाचं बलाबल..

नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतर तिथे पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.

नांदेड हा तसा पाहिला तर कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०१४मध्ये शिवसेनेनं इथे काँग्रेस उमेदवाराला पराभूत करत अशोक चव्हाणांना मात देणं शक्य असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळेच यंदा देखील काँग्रेसेतर पक्षांकडून या मतदारसंघासाठी जोरदार प्रयत्न केले जातील अशी चिन्ह आहेत. त्यात भाजपानं देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची करत काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारला मात देण्याची संधी म्हणून जोर लावला आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.