केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर आज राणेंनी पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली. यावेळी राणेंना पत्रकारांनी अनेक प्रश्न राणेंना विचारले. या प्रश्नांमध्ये नारायण राणेंना जमीन मंजूर झाल्यानंतर मध्य रात्रीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणेंनी पाऊणच्या सुमारास केलेल्या ट्विटसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. विरोधकांना नितेश राणे यांनी अगदी फिल्मी स्टाइलमध्ये करारा जवाब मिलेगा असं थेट आव्हान एक डायलॉग शेअर करत दिलं होतं. त्यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> अटक आणि जामीन प्रकरण : पंतप्रधान मोदींशी यासंदर्भात चर्चा झाली का?; राणे म्हणाले…

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले. सोमवारी रात्री राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मुंबईमध्ये शिवसेनेनं राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर नितेश राणेंनी ट्विटरवरुन जुहूतील घराखाली शिवसेैनिक जमा झाल्याचं मध्यरात्रीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींनंतर राणेंना जमीन मंजूर करण्यात आल्यावर नितेश यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांना फिल्मी स्टाइल आव्हान दिलं.

नक्की वाचा >> ‘राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी…’; ‘सामना’मधून हल्लाबोल

नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीवर चित्रित करण्यात आलेला एक व्हिडीओ पोस्ट केलाय. राजनिती या चित्रपटामधील आहे. व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करताना, “आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,” असं म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, “करारा जवाब मिलेगा,” असंही म्हणतो. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणेंनी मंगळवारी राज्यामध्ये घडलेल्या नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका प्रकरणावरुन विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. रात्री पाऊणच्या सुमारास नितेश यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचा उल्लेख जखमी सिंह असा केलाय.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले…

याच ट्विटसंदर्भात राणेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राणेंनी, “त्याने वक्तव्य केलं आहे तर तुम्ही त्याला विचारा. करारा जवाब कसा असतो हे त्याला जास्त माहितीय”, असं म्हटलं. तसेच नितेश दौऱ्यावर असल्याने आपलं त्याच्याशी सविस्तर बोलणं झालेलं नाही असंही राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस राणेंना त्यांच्या गडीमध्ये बसवून नेत असतानाच राणेंचे पुत्र निलेश राणे हे गाडीच्या एका बाजूने आडवे येत गाडी पुढे जाण्यापासून अडवत होते. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाजूला करत राणेंच्या गडीसमोरील मार्ग मोकळा केल्याचं पहायला मिळालं.