शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन स्वतंत्र मेळावे आयोजित करण्यात आले. या दोन्ही मेळाव्यांत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांनी एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, शिवसेनेतील बंडखोरी यावर भाष्य केले. तसेच संरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी लक्ष्य केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर आता केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते राणायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील फरक सांगितला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>>> दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”

शिवसेनेचा दसरा मेळावा जेथे होते त्या मैदनाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे. मात्र या मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभेत शिव्या दिल्या. ही सभा शिव्या देण्यासाठी बोलवली होती का? असा प्रश्न पडतो. बाळासाहेब ठाकरे दसऱ्याच्या दिवशी शिवसैनिकांना विचारांचे सोने द्यायचे. मात्र या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिव्या देण्याचे काम केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी विचारांची मेजवानी असायची. या विचारांच्या मेजवानीतून आम्हाला प्रेरणा मिळायची. विधायक सामाजिक कार्याचे धडे मिळायचे. यातूनच आमची जडणघडण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या याच विचारांमुळे आज मी येथे आहे, असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा >>>> “पंतप्रधान मोदींना मी दारुडा म्हणत नाही, पण त्यांची वागणूक…,” प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभेत टीका

उद्धव ठाकरे यांना दुसरे काही येते का? मोठ्या लोकांचे नाव घेऊन आपण टीका केली की, आपल्याला कोणीतरी मोठं म्हणेल असे त्यांना वाटते. म्हणूनच ते जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असतात. उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले. ते अडीच वर्षांमध्ये फक्त अडीच तास मंत्रालयात आले. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेले एकतरी काम सांगावे, असे आव्हान नारायण राणे यांनी दिले.

हेही वाचा >>>> ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी, दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मागणी

यावेळचा शिवाजी पार्कवरील मेळावा हा तमाशाकारांचा होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना खूप खाली आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकापेक्षा एक वक्ते असायचे. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात पोकळ वल्गना आणि शिव्या-शापाशीवाय काहीही नव्हते, असेही नारायण राणे म्हणाले.