उद्धव ठाकरेंनी आमंत्रण आल्यास दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...| narayan rane comment on uddhav thackeray dussehra melava presence | Loksatta

उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिल्यास दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षाचे दोन गट पडले आहेत.

उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिल्यास दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे (संग्रहित फोटो)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षाचे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होणार आहेत. मेळावे यशस्वी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. आमच्याच मेळाव्याला जास्त गर्दी होणार असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. दरम्यान, शिवसेनेच्या या दोन दसरा मेळाव्यांची चर्चा सुरू असतानाच अन्य पक्षीय नेतेही यावर मत व्यक्त करत आहेत. भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले असून आमंत्रण आल्यास उपस्थित या मेळाव्यास राहणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

हेही वाचा >>> “रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण…”, उदयनराजेंची खोचक शब्दांत टीका

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण आल्यास उपस्थित राहणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, आम्हाला आमंत्रण आले तर नक्कीच दसरा मेळाव्यास उपस्थित राहू. उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही बाजूने आमंत्रण आले तर उपस्थित राहणार. मात्र ते मला आमंत्रण देणार नाहीत याची मला खात्री आहे, असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा >>> अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

दरम्यान, येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि आमच्याच दसरा मेळाव्यास लोकांची उपस्थिती असेल, असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. हा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी दोन्ही गटातील नेतेमंडळी कामाला लागलेले आहेत. आपापल्या मतदारसंघातून लोकांची गर्दी जमवण्यासाठी सर्व आमदार नियोजन करत आहेत. शिंदे गटाचा मुंबईतील बिकेसी तर उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण…”, उदयनराजेंची खोचक शब्दांत टीका

संबंधित बातम्या

“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
“…त्याचा मी पुरावा आणला आहे”, म्हणत आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्रच वाचून दाखवलं!
“कोणाच्या बापात दम आहे का बघतो, तुमच्यात दम असता तर…”, बाळासाहेबांचं नाव घेत सदावर्तेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी
‘काश्मीर फाइल्स’ प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत
गोवरचा फैलाव करोनापेक्षा पाचपट वेगाने!; लस उपलब्ध असल्यामुळे धोका मात्र कमी
अठरा हजार पदे, आतापर्यंत सव्वाबारा लाख अर्ज !; पोलीस भरतीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
जतच्या पाणीपुरवठय़ात कर्नाटकचाच खोडा; संयुक्त पाणी योजनेचा महाराष्ट्राचा प्रस्ताव धुडकावल्याने पाणीटंचाई