सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या वर उठसूठ टीका करणाऱ्या उध्दव ठाकरे याला जशास तसे उत्तर दिले जाईल तर देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करणाऱ्या मनोज जरांगे चा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिला.

सिंधुदुर्ग भाजपचे विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन उद्घाटन खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार,राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.

हेही वाचा…पुणे येथील तिघे दरोडेखोर आंबोलीत शस्त्रासह जेरबंद, दोन बंदुकासह काडतूसे जप्त

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता पर्यंत पुण्याच्या अधिवेशनातील संदेश पोहोचला पाहिजे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुक होईल. सन २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रयत्न केला. मात्र १४५ आमदार विजय झाले नाही. आपल्या वर झालेला विश्वासघात लक्षात ठेवून येत्या साडेतीन महिन्यांत भाजपने १४५ मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्या दिशेने यशस्वी प्रयत्न केला पाहिजे.