काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केल्याने भाजपा नेते काँग्रेसविरोधात आक्रमक झाले आहेत. खरगेंच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, शिवाय भाजपाकडून प्रत्युत्तरही दिलं जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही खरगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, “आता या देशात रावणाची भूमिका कोणी केली? आता भारत जोडो आठवला, पण एवढ्या वर्षात भारत का जोडला नाही? पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की आम्ही आर्थिक बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आणणार, आत्मनिर्भर भारत बनवणार. तुम्ही आत्मनिर्भर बनवला असता, तुमच्या पक्षाने जर महासत्तेकडे वाटचाल केली असती तर बोलायची गरज नाही. आता ही वाताहाता आणि एवढं जोडोसाठी फिरावं लागलं नसतं. काय झालं जोडून?”

हेही वाचा – “… म्हणून उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द उच्चारूदेखील नये”; नारायण राणेंची टीका

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ दोन दिवस बाकी आहेत. असे असताना येथे भाजपा, आप पक्षांकडून जोमात प्रचार केला जात आहे. तर काँग्रेसचे नेतेदेखील तेवढ्याच क्षमतेने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.दरम्यान, एकीकडे सर्वच पक्ष प्रचारात गुंतलेले असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरत आहे. येथे एका सभेला संबोधित करताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. याच कारणामुळे भाजपानेही काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

मल्लिकार्जुन खरगे नेमकं काय म्हणाले? –

मलिल्काकर्जुन खरगे सोमवारी अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर सडकून टीका केली. यावेळी खरगे यांनी मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. “भाजपा सगळीकडे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करते. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकामध्ये मोदींच्या प्रतिमेचा वापर केला जातो. आम्ही तुमचा चेहरा कितीवेळा पाहावा. मोदी १०० डोकी असलेले रावण आहेत का?” असे खरगे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane responded to congress president mallikarjun kharge who compared prime minister narendra modi with ravana msr
First published on: 29-11-2022 at 18:36 IST