नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज (१० जून) सायंकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी खातेवाटपही केलं. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडील जुनी खाती कायम ठेवण्यात आली आहेत. तर काही नव्या चेहऱ्यांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात अमित शाह गृहमंत्रालयाचा कारभार पाहतील. तर राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र) आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. तर नव्यानेच मंत्रिमंडळात समाविष्ट केलेल्या भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आरोग्य मंत्रालयाचा कारभार दिला आहे. तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषीमंत्रिपद देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची टीका होत आहे. ४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. नितीन गडकरी (भाजपा) आणि पीयुष गोयल (भाजपा) या दोन नेत्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. रक्षा खडसे (भाजपा), मुरलीधर मोहोळ (भाजपा), प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट), रामदास आठवले (आरपीआय) या महाराष्ट्रातील चार नेत्यांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.

कॅबिनेट मंत्री

१. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
२. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

१. प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

१. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
२. रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
३. मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

हे ही वाचा >> “भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदांवरून एनडीएत वाद पेटला?

कुणाला कुठलं मंत्रिपद? (कॅबिनेट)

 • राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
 • अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
 • नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
 • जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
 • शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
 • निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
 • डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
 • मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
 • एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
 • पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
 • धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
 • जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
 • राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
 • सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
 • वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
 • के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
 • प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
 • जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
 • गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
 • अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
 • ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
 • भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
 • गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
 • अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
 • किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
 • हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
 • मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
 • जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
 • चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
 • सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi cabinet portfolios allocated murlidhar mohol raksha khadse prataprao jadhav nitin gadkari asc
First published on: 10-06-2024 at 21:35 IST