Narhari Zirwal on Gokul Zirwal meets Jayant Patil : “गोकुळ झिरवाळला मीच जयंत पाटलांची भेट घेण्यासाठी पाठवलं होतं’, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. गोकुळ झिरवाळ व जयंत पाटील यांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. “मीच गोकुळला सूचना दिल्या होत्या की जयंत पाटील यांचा सत्कार कर. वडिलांचे काही गुण त्याच्यात असल्यामुळे त्यानेही सूचनांचं पालन केलं आणि जयंत पाटलांचा सत्कार केला. तसेच तो निवडणूक लढवायला तयारही झाला आहे”, असं झिरवाळ म्हणाले. यासह त्यांनी स्पष्ट केलं की “गोकुळ झिरवाळबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नये, तो आता योग्य जागेवर आहे”.

आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकूळ झिरवाळ यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. इतकंच नव्हे, तर त्यांनी वडील नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार गटाकडे परत यावं, अशी इच्छा देखील व्यक्त केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या चर्चांवर आता नरहरी झिरवाळ यांनी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा >> Dhangar Reservation : धनगर आरक्षणावरून महायुतीत वाद? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवार गट नाराज; म्हणाले, “आमचे लागेबंधे…”

गोकुळबद्दल शंका घेऊ नका : नरहरी झिरवाळ

नरहरी झिरवाळ म्हणाले, आमच्या घरी रोज चर्चा होते, त्या दिवशी मीच गोकुळला जयंत पाटलांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. मी त्याला सांगितलं होतं की माझा नेता (जयंत पाटील) आहे, तू जाऊन फक्त त्यांचा सत्कार करून ये. त्यानुसार तो गेला व त्याने सत्कार केला. मात्र त्याला तिथे लोकांनी थांबवलं आणि त्यावेळी त्याला माध्यमांनी जे प्रश्न विचारले त्याव त्याने उत्तरं दिली. त्याच्याकडे त्याच्या वडिलांसारखे थोडेफार का होईना गुण आहेत. मात्र त्याच्याबाबत जो काही संभ्रम तयार झाला होता तो आता दूर झाला आहे. गोकुळ आता जागेवरच आहे, कायमस्वरूपी एका जागेवर राहील, त्याच्याबाबत शंका घेण्याचं कारण नाही.

हे ही वाचा >> महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “जिंकण्यासाठी…”

निवडणुकीच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

दरम्यान, गोकुळ झिरवाळ यांनी जयंत पाटलांकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली होती, यावर नरहरी शिरवाळ म्हणाले, “त्याने ते केवळ विनोदाने म्हटलं होतं. विनोद करायचा म्हटल्यावर मी मुख्यमंत्री होईन असंही म्हटलं असतं”.

Story img Loader