TCS Conversion Case Nashik latest news on religious conversion racket and police investigation : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या बीपीओ युनिटमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे धक्कादायक रॅकेट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या एदा दोन वर्षांपूर्वीच्या फोटोने या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. तपासकर्त्यांनी दावा केला आहे की, या फोटोमधून पीडितांना कशाप्रकारे प्रभावित केले गेले आणि धर्मांतरास प्रवृत्त केले गेले हे स्पष्ट होत आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फोटोमध्ये मुख्य आरोपी तौसिफ अत्तार हा एका गोपाल (नाव बदललेले) नावाच्या व्यक्तीच्या शेजारी उभा असल्याचे दिसून येत आहे, गोपालने नंतर धर्मांतर केले आणि तो गुलशन बनला. जेव्हा हा फोटो अरोपीच्या मोबाईल फोनमधून जप्त करण्यात आला, तेव्हा अधिकार्‍यांना सुरूवातीला संशय होता की पांढरी टोपी घातलेला हा व्यक्ती त्यांच्याच ग्रुपमधील एक सदस्य असावा. मात्र, जेव्हा अत्तार याची सखोल चौकशी केली गेली तेव्हा, ती व्यक्ती आरोप नसून त्याच आयटी कंपनीतील कर्मचारी आहे आणि तो यापूर्वी धर्मांतर करण्यात आलेला कथित पीडित असल्याची बाब समोर आली.

तपासकर्त्यांनी सांगितले की, हा फोटोमध्ये या कथित प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा दिसून येतो, ज्यामध्ये पीडित व्यक्ती हा बदललेल्या पेहरावात आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होत असल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांचे श्रद्धा बदलण्यासाठी सातत्याने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, त्यांना धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि इतर विधींमध्ये सहभागी करून घेत हळूहळू नवीन प्रथा स्वीकारण्यास कसे प्रवृत्त केले गेले, हे या फोटोंमधून दिसून येते.

पीडिताचे गंभीर आरोप

या व्यक्तीचा जबाब नोंदवल्यानंतर, पोलिसांनी सांगितले की त्या व्यक्तीने आपल्याशी कसा संपर्क साधण्यात आला आणि कालांतराने त्याला कसे प्रभावित करण्यात आले याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. कथित पीडित व्यक्तीने दावा केला की, त्याला त्याच्या अडचणीच्या काळात लक्ष्य करण्यात आले आणि श्रद्धा बदलण्याच्या उद्देशाने त्याला वारंवार संवाद, व्हिडीओ आणि दबाव टाकून लक्ष्य करण्यात आले.

तक्रारदाराने यापूर्वी सांगितले होते की, “मार्च २०२३ मध्ये माझ्या वडिलांना पॅरालिटीक अटॅक आला होता. त्यावेळी मी प्रचंड कौटुंबिक अडचणींचा सामना करत होतो.” त्याने हेही सांगितले की त्याचे कंपनीतील सहकारी हे त्याच्याशी त्यांच्या धर्माविषयी बोलू लागले आणि त्याला काही विशिष्ट प्रथांचे पालन करण्यास प्रोत्साहित करू लागले.

त्याने आरोप केला की त्याला वारंवार सांगण्यात आले की, त्याचा धर्म हा चुकीचा आहे आणि त्यांच्या धर्मांच्या प्रथांचे पालन केल्यास त्याला त्याच्या अडचणींचे उत्तर मिळून जाईल. “त्या वेळी मी मानसिकरित्या अस्थिर होतो आणि त्यामुळे, मी त्यांचे ऐकण्यास सुरूवात केली. त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून त्यांनी मला वेगवेगळे व्हिडीओ पाठवाण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या श्रद्धांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला,” असे तो म्हणाला.

पीडित व्यक्तीने सांगितले की, त्याच्यावरील दबाव वेळेबरोबर वाढतच गेला, त्याचे नाव बदण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच त्याला त्याच्या इच्छेच्या विरोधात विधींमध्ये सहभागी होण्यासाठी सक्ती करण्यात आली. त्याने असाही दावा केली की, त्याच्या धर्माबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्यात आली, इतकेच नाही तर त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत भीती देखील निर्माण करण्यात आली.

त्यांनी माझ्यावर माझे नाव बदलून मुस्लिम नाव स्वीकारण्याबबात दबाव टाकला आणि मला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचा विरोध केला, पण तरीही ते मला धार्मिक विधींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले आणि माझ्या इच्छेविरोधात गोष्टी करण्यास भाग पाडले.

पोलिसांनी सांगितले की फोटोग्राफ आणि पीडित व्यक्तीचा जबाब दोन्ही गोष्टी एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे, प्रभावित करणे आणि जबरदस्ती करण्याचा एक विशिष्ट पॅटर्न दाखवून देतात. दरम्यान या प्रकरणाच तपास सुरू असून या कथित नेटवर्कची व्याप्ती निश्चित करण्यासाठी तपासकर्ते डिजीटल पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांची पडताळणी करत आहेत.