उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कमी काळात पक्षात आपले स्थान निर्माण केले. मागील काही दिवसांमध्ये त्यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे नेते नारायण राणे, नितेश राणे यासारख्या अनेक नेत्यांना घेरलं. त्यांनी आता अमरावतीच्या खासदार नवनीता राणा यांच्यावर त्यांच्या कथित खोट्या जात प्रमाणपत्राचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांच्या याच टीकेला आता नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी त्यांना ओळखत नाही, असे राणा म्हणाल्या आहेत.

मी त्यांना ओळखत नाही- नवनीत राणा</strong>

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
Shiv Sena Shinde group and BJP will campaign for the candidate of the grand alliance in Mira Bhayandar city
वरिष्ठांनी कानउघडणी केल्यानंतर स्थानिक नेते नरमले; मिरा भाईंदर मध्ये महायुती एकत्रित काम करणार

“मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणार नाही. सध्या जो विषय कोर्टात आहे, त्यावर अंधारे यांना बोलण्याचा अधिकार नाही. सुषमा अंधारे न्यायाधीश नाहीत. मी त्यांना ओळखत नाही. रोज फिरणाऱ्या लोकांच्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही,” असा पलटवार नवनीत राणा यांनी केला. तसेच मी एक लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीशी निगडीत काही प्रश्न असतील तर विचारा,” असे म्हणत राणा यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

“भाजपाला माझ्याविरोधात येत नाही. भाजपाला माझा गुन्हेगारी इतिहास काढता येत नाही. नवनीत आक्कांनी जसं जात प्रमाणपत्र वापरलं तसं एखादं बोगस जात प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढता येत नाही. तेव्हा मग ही बाई धर्मविरोधी आहे, असं बोलायचं; अशी भाजपाची भूमिका आहे,” असे विधान सुषमा अंधारे यांनी केले होते.