scorecardresearch

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, नवरात्रीत शेवटचे तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरब्याला परवानगी

Navratri 2022 : मागील दोन वर्षापासून निर्बंध असलेल्या गरब्याला आता राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, नवरात्रीत शेवटचे तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरब्याला परवानगी
गरबा ( संग्रहित छायाचित्र )

करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी आणि गणोशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आलं आहे. त्यानंतर आता शिंदे सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात देखील राज्य सरकारने 3 दिवस गरब्याला मध्यरात्रीपर्यंत परवानगी दिली आहे.

नवरात्रोत्सवात रात्री १२ पर्यंत गरबा खेळण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आयोजकांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर आता तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. 1, 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळता येईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारने ३ आणि ४ ऑक्टोबरला १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली होती. पण, आता यामध्ये एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोंबरला देखील आता आयोजकांनी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या