‘भाजपा आणि ड्रग्ज पेडलरच्या नात्यांबद्दल बोलूयात’ म्हणत नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केले असून देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा एक फोटो शेअर केलाय.

Nawab malik Alleged BJP and drug peddler connection
नवाब मलिक यांनी भाजपावर साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

“चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय.

अन्य एका ट्विटमध्ये या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिलीय.

फोटोमध्ये अमृता यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती जयदीप राणा असून या व्यक्तीला जून २०२१ मध्ये एनसीबीने अटक केल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती सध्या तुरुंगामध्ये असल्याचा दावा केला जातोय. नवाब मलिक यांनी या ट्विटनंतर आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मलिक आणखीन काही खुलासा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मलिक यांनी यापूर्वीही भाजपाच्या काही नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप केले होते. मात्र यावेळेस त्यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा फोटो शेअर करत खळबळ उडवून दिलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik alleged bjp and drug peddler connection by sharing photo of devendra fadnavis wife amruta fadnavis scsg

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या