scorecardresearch

Video : भंगारवाला ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील मंत्री… असा आहे नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

राज्याच्या कॅबिनेटमध्ये अल्पसंख्यांक मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांना ईडीने अटक केलीय.

Nawab Malik Political Journey
आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना करण्यात आली अटक (फोटो एनआयवरुन साभार)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> Nawab Malik Arrest : “मला अटक झालीय, पण…”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया

मागील काही महिन्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते आहेत. एक भंगारवाला ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा नवाब मलिक यांचा प्रवास राहिलाय. त्यांच्या अटकेबरोबरच महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील दुसरा मंत्री आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलाय. जाणून घेऊयात कसा राहिलाय नवाब मलिक यांचा कॅबिनेट मंत्री पदापर्यंतचा प्रवास…

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik arrest by ed scrap dealer to cabinet minister of maharashtra journey of ncp leader scsg

ताज्या बातम्या