“मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको म्हणून…”, नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र

निलोफर यांनी From the wife of an Innocent : The Beginning असं शीर्षक या पत्राला दिलं आहे.

Nilofer Nawab Malik
छायाचित्र सौजन्य – निलोफर मलिक खान ट्विटर

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या क्रूज ड्रग पार्टीवरील कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. यावर सध्या राजकीय खळबळ सुरू असून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही यात गंभीर आरोप केले. यानंतर आता त्यांची मुलगी निलोफर मलिक-खान यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं आहे.

समीर वानखडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतर मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर पत्र शेअर केलं आहे. यातून त्यांनी ‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं’ असं लिहित हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिने पती समीर खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर खुले पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहे.

निलोफर यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतरही निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. ‘जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा’ असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ट्विट करत निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर खुले पत्र शेअर केले आहे.

हे पत्र शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी ‘एका निष्पापाच्या पत्नीचे खुले पत्र’ असं म्हणत ‘सुरुवात’ असं लिहिलं आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे यावर आता विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik daughter nilofer wrote a letter shared on social media vsk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना