scorecardresearch

“खोटंच बोलायचंय तर असं तरी बोला की…”; समीर वानखेडेंचे आरोप नवाब मलिकांनी फेटाळले

तीन वर्षांच्या मुलांचे फोटोही नवाब मलिकांनी उघड केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मात्र, त्या आरोपाचं खंडन नवाब मलिक यांनी आता केलं आहे.

“खोटंच बोलायचंय तर असं तरी बोला की…”; समीर वानखेडेंचे आरोप नवाब मलिकांनी फेटाळले

नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप लावण्याचं सत्र सुरू केलं आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांना प्रत्युत्तर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर आणि परिवार वारंवार देत आहेत. त्यांनी काही नेत्यांच्या भेटी घेत मलिकांच्या आरोपांचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे.समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेत त्यांच्याकडेही तक्रार केली. तीन वर्षांच्या मुलांचे फोटोही नवाब मलिकांनी उघड केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मात्र, त्या आरोपाचं खंडन नवाब मलिक यांनी आता केलं आहे.

याबद्दल नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “वानखेडे जेव्हा हलदर यांच्या भेटीला गेले होते, तेव्हा समीर यांनी त्यांना सांगितलं की मी लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. लहान मुलांची नावं घेतली, वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नीचंही नाव घेतलं. पण मी जबाबदारपणे सांगतो की त्यांच्या दुसऱ्या बायकोचं मी नावही घेतलेलं नाही. ना त्यांच्या मुलांची नावं किंवा फोटो जाहीर केले आहेत. जर खोटंच बोलायचं आहे तर नीट तरी बोला म्हणजे किमान लोकांना वाटेल की तुम्ही खोटं बोलत नाही”.

काय आहे हे प्रकरण?

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांमुळे त्रास होत असल्याचा दावा करत वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वानखेडेंनी हलदर यांना सांगितलं की नवाब मलिकांनी तीन वर्षांच्या मुलांचे फोटो ऑफिशिअल अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. म्हणजे एवढं उच्चस्तरीय, एवढा मोठा व्यक्ती असूनही ते असं का वागत आहेत कळत नाहीये. मुलांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांचा फोटो कुठेही शेअर केलेला नाही. पण नवाब मलिकांनी तीन वर्षांच्या लहान मुलांचेही फोटो शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या