आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याच्या भावाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून केली हत्या

रात्री घरात घुसून केला गोळीबार

(संग्रहित छायाचित्र)

आत्मसमर्पीत नक्षली यशवंत बोगाच्या आत्मसमर्पणाला त्याचा लहान भाऊ जबाबदार आहे असे गृहीत धरून नक्षलवाद्यांनी मध्यरात्री दायसींग अंकलु बोगावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. ही घटना जिल्हयातील धानोरा तालुक्यातील गॅरापती पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या वडगाव येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, मृतक दायसींग अंकलु बोगा हा वडगाव येथील राहत होता. तो गुरुवारी घरी असताना साडेदहाच्या सुमारास आठ ते दहा नक्षलवादी अचानक त्याच्या घरात घुसले. त्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार करत दायसींग अंकलु बोगाची हत्या केली. उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा अंतर्गत येणाऱ्या ग्यारपती पोलीस मदत केंद्रात येत असलेल्या वडगाव येथील घटना असून पोलिसांनी अज्ञात नक्षल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे व त्याअंतर्गत तपास सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naxal killed brother of man who surrender in front of police scsg

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या