मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या ६ प्रकरणांमध्ये नवाब मलिक यांच्या जावयाचा संबंध असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आले.आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह सहा तपासांचे नेतृत्व करणाऱ्या एजन्सीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीच्या आरोपानंतर प्रकरणे हस्तांतरित करण्यात आली होती.

मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. मंत्री अमली पदार्थ विरोधी पथकावर सतत हल्ले करत असल्याने पुढील राजकीय वादाला तोंड फुटणार हे जवळपास निश्चित आहे. जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय पहिल्यांदा गेल्या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आला होता, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

एनसीबीला २० हजार रुपये किमतीच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्यानंतर नवाब मलिकांचा जावई समीर खानला एका ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. त्याला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणेने सांगितले की २०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज होते, परंतु मलिक यांनी “हर्बल तंबाखू” असल्याचा दावा केला आणि सप्टेंबरमध्ये समीर खान यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

NCB ने गेल्या महिन्यात बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.