जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?; एनसीबी अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर भाजपाचा सवाल

“हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण?”

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील गोरेगावमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यासह पथकावर ड्रग्ज तस्करांनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडल्याचं समोर आलं. हल्ला करणाऱ्यांपैकी काहीजणांना अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजपानं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रात जंगलराज आणताय का?, असा सवाल केला आहे.

गोरेगावमध्ये एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी एनसीबीचं पथक गेलं होतं. त्यावेळी ही घटना घडली होती. या घटनेबद्दल भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. “मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला. ड्रग्ज रँकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणतेय? कुणाला सत्य समोर येईल याची भीती वाटतेय? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

गोरेगावात काय घडलं?

कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथक गेलं होतं. ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. गोरेगावमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती. हल्ल्यानंतर कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं आहे. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncb zonal director sameer wankhede attacked allegedly by drug peddlers ashish shelar thackeray sarkar bmh

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या