Chhagan Bhujbal : विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आलेली नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. छगन भुजबळ यांनी तर जाहीर नाराजी बोलून दाखवत वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात इशाराही दिला होता. एवढंच नाही तर जहां नहीं चैना, वहां नहीं रहना असं म्हणत छगन भुजबळांनी सूचक इशाराही दिला होता. तसेच अजित पवार, सुनील तटकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्ष टीका केली होती.

दरम्यान, मध्यंतरी भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. दरम्यान, आज छगन भुजबळ त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं. ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Bhagwant Mann's Delhi residence
Bhagwant Mann: दिल्लीत मोठी घडामोड; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर निवडणूक आयोगाची धाड, ‘आप’चा आरोप
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”

हेही वाचा : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान

छगन भुजबळ काय म्हणाल्या?

“अनेकांचे पतंग कापले. आता आपल्या सहकाऱ्यांबरोबर पुन्हा पतंग उडवू”, असं मिश्किल विधान छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं. मात्र, भुजबळ यांच्या या विधानाला मंत्रिपद न मिळाल्याची किनार होती. याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांना विचारलं की तुमचाही पतंग अडीच वर्षांसाठी कापला गेला आहे का? यावर उत्तर देताना भुजबळांनी म्हटलं की, “माझा पतंग कापलेला नाही. मी येवला मतदारसंघाचा पाचव्यांदा आमदार आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की, माझा जन्म येवल्यात झालेला नाही. माझं घरदार किंवा कुटुंब येवल्यातील नाही. तरीही येवला आणि लासलगावच्या लोकांनी मला मागचे २० वर्ष आणि पुढच्या पाच वर्षांसाठी आमदारकी बहाल केलेली आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

Story img Loader