केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यावेळी भूमिका मांडली. पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही नामंजूर केले.

धर्मयुद्ध टाळण्याचा शक्यतोवर प्रयत्न करीत असल्याचा सूचक इशारा देत पंकजा मुंडे यांनी माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचं स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळून मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Raj Thackeray Padwa melava
“राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल”, मनसेच्या वरिष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
Supriya Sule and Sunetra pawar
Video: ताई-वहिनी नव्हे, ‘साहेब कोण’ याचा फैसला करणारी निवडणूक

मोदी, शहा आणि नड्डाच नेते; धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न!

दरम्यान राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचं नाव का घेतलं नाही?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

“ताईंनी आज कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका,” असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही

‘मी निवडणूक हरले, पण संपले नाही, म्हणून तर संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. मी कोणाकडेही कधीही पद मागितले नाही. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी भावना त्यावेळी संघर्ष यात्रेत जनतेकडून व्यक्त झाली होती. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला वंचितांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणले. मला किंवा माझ्या बहिणीला मंत्री करा, यासाठी आम्हाला राजकारणात आणलेले नाही. हे आमच्यावर संस्कार नाहीत.’

भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत त्या म्हणाल्या की, ‘मी माझ्या समाजाच्या मंत्र्याला अपमानित का करू? पक्ष हे आपल्या कष्टाने तयार केलेले घर आहे, ते मी का सोडू?’ असा सवालही मुंडे यांनी केला.

‘माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू’, अशी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मला दबावतंत्र करायचे नाही. मी संघटनेच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून अत्यंत सन्मानाची वागणूक मिळाली. कार्यकर्त्यांची नाराजी दूर कराल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो.’

‘पक्षाने मला खूप दिले आहे, पक्षाने दिलेले मी लक्षात ठेवते. जे दिले नाही, ते तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळी मला वाटेल, येथे राम नाही, त्यावेळी बघू’, असे सांगून भाजपमध्येच राहणार असल्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आणि या संदर्भातील चर्चाना पूर्णविराम दिला.