शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राजकीय वर्तुळाला पहिला धक्का बसला. आणि त्यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १०५ आमदारांचा पाठिंबा असूनही मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं दुसरा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातली एक व्हिडीओ क्लिप शेअर करत सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे. अमोल मिटकरींचा हा निशाणा थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या दिशेनं असल्याचं बोललं जात आहे.

काय आहे ट्वीटमध्ये?

अमोल मिटकरींनी गुरुवारी संध्याकाळी केलेल्या या ट्वीटमध्ये “जुनं ते सोनं म्हणतात ते यालाच”, असा उल्लेख केला आहे. या संदेशासोबत त्यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातली व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. त्यामध्ये दिवंगत मराठी अभिनेते सदाशिव अमरापूरकर एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत दुसऱ्या पात्राचा असलेला संवाद या क्लिपमध्ये असून तो सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चपखलपणे भाष्य करतोय, असं मिटकरींना यातून सूचित करायचं असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

काय आहे या व्हिडिओ क्लिपमध्ये?

या व्हिडीओ क्लिपमध्ये सदाशिव अमरापूरकर एका अट्टल राजकारण्याच्या भूमिकेत असून त्यांचा दुसऱ्या पात्राशी संवाद सुरू आहे. यात दुसऱ्या पात्रानं अमरापूरकरांनी बांधलेल्या एका मंदिराचा उल्लेख करून त्यांना सवाल केला आहे. “मोठा घोळ केला तुम्ही. एवढं झकास देऊळ बांधलं आणि त्याचा पुजारी अण्णा बाळाला केला”, असा सवाल क्लिपमध्ये अमरापूरकर यांना विचारताच त्यावर अमरापूरकर यांनी बेरकी राजकारण्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे.

“…तोपर्यंतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील”, संजय राऊतांचं भाकित, भाजपालाही केला सवाल!

“पुजारी अण्णा बाळाला केला, कारण आपल्याला देव व्हायचंय. यालाच राजकारण म्हणतात. आपलं आपणच पागोटं डोक्यावर ठेऊन घ्यायचं नसतं. दुसऱ्याला ठेवायला द्यायचं असतं. म्हणजे ठेवणाराही खूश आणि घालून घेणाराही खूष”, असं अमरापूरकर निभावत असलेलं पात्र या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

काय घडलं राज्याच्या राजकारणात?

महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी मोठी उलथापालथ झाली. जिथे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद दिलं. शिवाय आधी आपण मंत्रिमंडळात देखील सहभागी होणार नसल्याचं सांगणाऱ्या फडणवीसांनी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून अनेक तर्क सध्या लावले जात आहेत.