scorecardresearch

Dhananjay Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली घटना; डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

NCP MLA Dhananjay Munde Accident: परळीमध्ये मध्यरात्री १२च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून ट्विटरवर देण्यात आली आहे.

Dhananjay Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली घटना; डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dhananjay Munde Accident in Parli: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला झालेल्या अपघाताच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट रीट्वीट केलं आहे.

नेमकं घडलं काय?

धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे.

ट्वीट करून दिली माहिती

या ट्वीटमध्ये घटनाक्रम सांगण्यात आला आहे. “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परत येत असताना रात्री १२.३० च्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे”, अशी माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, या ट्वीटवर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या