"आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही," पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान | NCP Dhananjay Munde on Relations with Sister Pankaja Munde sgy 87 | Loksatta

मुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा? धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला

मुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा? धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”
संग्रहित फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहीण पंकजा मुंडे यांच्याशी असणाऱ्या नात्यात दुरावा आल्याची कबुली दिली आहे. आमचं नातं आता बहीण भावाचं राहिलेलं नाही असं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला आहे.

“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

काय म्हणाले धनंजय मुंडे –

“आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंधं आधी होते, नात्यातून राजकारणात वैर निर्माण झालं. त्यामुळे आपल्या वक्तव्याने, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याचं त्याने आत्मपरीक्षण करावं. वारंवार अशी वक्तव्यं करताना, ज्याचं त्याने आकलन करुन त्या पद्दतीने मांडावं,” असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…”

पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया –

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या विधानावर पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की “गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचं नातं कधी संपत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं असलं तरी मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असते. राजकारणात मला कोणी वैरी वाटत नाही. जो जनतेच्या हिताचा वैरी, तो माझा वैरी आहे”.

पंकजा मुंडेंच्या कोणत्या वक्तव्यावरुन वाद

“आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडेंनी बीडमध्ये बोलताना म्हटलं. यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंनी या विधानावर स्षष्टीकरणदेखील दिलं असून विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख!

संबंधित बातम्या

संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…
गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक्झिट पोलनुसार…”
कन्नडिगांकडून पुन्हा ट्रकला फासलं काळं : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “घाबरटांनी शिवसेना…”
“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”
गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
Video : अंगावर पीठ ओतलं, ढकलून दिलं अन्…; राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात धिंगाणा, “अत्यंत बेकार बाई आहेस” म्हणत अपूर्वा भडकली
बापरे! बाळाने खेळणं समजून किंग कोब्राची मान धरली, काही सेकंदातच असं घडलं…; Video होतोय Viral