रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनी वर्चस्व राखले. भाजपाने सहा जागा जिंकत चंचूप्रवेश केला. तर शेकापची पिछेहाट झाली. काँग्रेस मतदारांवर फारसा प्रभाव दिसून आला नाही. जिल्ह्यातील खालापूर, पाली, माणगाव, तळा, म्हसळा आणि पोलादपूर नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया गुरुवारी पार पडली. १०२ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३८, शिवसेनेनी ३५, शेकापने १२, काँग्रेसने ८, भाजपाने ६ तर इतर ३ उमेदवार विजयी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील तळा आणि म्हसळा या दोन नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता मिळवली. मात्र माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.तळा नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडून हिसकाऊन घेतली. मात्र माणगाव नगरपंचायत राखण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. येथे शिवसेना प्रणित माणगाव विकास आघाडीने राष्ट्रवादीला धक्का दिला. खरे तर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे तिघेही माणगाव मध्ये तळ ठोकून बसले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dominates nagar panchayat elections in raigad shiv sena in second place abn
First published on: 19-01-2022 at 19:57 IST