राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच ठाऊक आहे. भाजपा सोडताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच त्यांच्यामुळेच आपण भाजपा सोडत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी मात्र त्यांची जीभ घसरली. जळगावातील मुक्ताईनगरमधील जोंधणखेडा धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधत असताना तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘टरबूज’ असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यावर एकनाथ खडसेंनी मला माहिती नाही असं म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “पण मला एक माहिती आहे. इंटरनेट ओपन करा, गुगलवर जा आणि टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण? असं टाका. इथून घरी गेल्यानंतर सर्वात आधी हे काम करायचं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरीश महाजनांवर निशाणा

एकनाथ खडस यांनी यावेळी जामनेरवाल्याने माझ्या मागे ईडी लावली असं म्हणत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. “जामनेरवाल्याचं ऐकून माझ्या मागे ईडी लावली. नाथाभाऊच्या मागे इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिंबधक विभागाला लावायचं. घरी दोन वेळा इन्कम टॅक्सवाले येऊन गेले. एकदा तर धाड टाकली होती. मी फार्म हाऊसवर राहत असल्याने तुम्हाला माहिती नाही. लाचलुचपत विभागाने तपास केला असून कोणताही चुकीचा व्यवहार झालेला नाही. न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला असून कोणताही गुन्हा झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.