राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभागहात भाजपा सदस्यांवर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. सभागृहात नेहमी शांत असणारे जयंत पाटील यांनी यावेळी खाली बसून बोलणाऱ्या भाजपा सदस्यांनाही सुनावलं. सभागृहातील अनुपस्थितीचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित करताना देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या उत्तरावरुनही त्यांनी सुनावलं.

मंगळवारी सभागृहात भाजपाचे सदस्य उपस्थित नव्हते याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो, ‘डंके के चोटे पे’ गेलो. आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे” असं सांगितलं. यावर संतापलेल्या जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

“काश्मीर फाईल्स हा सिनेमा मध्यांतरानंतर कंटाळवाणा आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मिरी पंडितांना घरं बांधण्यासाठी दान करायला सांगा,ठ अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजपा आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून व्यत्यय करत असल्याचं लक्षात येताच जयंत पाटील संतापले. “खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा. आम्हालाही खाली बसून बोलता येतं. त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका,” असे खडे बोल जयंत पाटील यांनी सुनावले. यामुळे ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजपा सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पहायला मिळाली.

प्रत्येकाने काश्मीर फाईल्स पाहायला पाहिजे – फडणवीस

“काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर मी स्तब्ध आणि निशब्द आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. काश्मीरचं सत्य चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं आहे. हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. पंतप्रधानांनी ३७० कलम हटवून देशात कोणती क्रांती आणली हे समजून घ्यायचं असेल काश्मीर फाईल्स पाहिला पाहिजे,” असं फडणवीस चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.