डोकं शांत ठेवण्यासाठी पानमसाला खा; जितेंद्र आव्हाडांचा मुस्लिमांना सल्ला

मुस्लिमांना डोकं शांत ठेवा असा सल्ला देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी पानसुपारी, पानमसाला खा असं सांगितलं

NCP, Jitendra Awhad, Muslims, Pan Masala
मुस्लिमांना डोकं शांत ठेवा असा सल्ला देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी पानसुपारी, पानमसाला खा असं सांगितलं (File Photo: PTI)

डोकं शांत ठेवण्यासाठी पानमसाला खा असा सल्ला राज्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मुस्लिमांना डोकं शांत ठेवा असा सल्ला देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी पानसुपारी, पानमसाला खा असं सांगितलं. भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मुस्लिमांना डोकं शांत ठेवण्याचा सल्ला दिला. मुस्लिमांना विनंती करताना ते म्हणाले की, “जास्त मांस खाऊन डोकं गरम करू नका. तुमचं डोकं शांत ठेवा. तुमचं डोकं गरम व्हावं हेच तुमच्या विरोधकांना हेच हवे आहे, पण तुम्ही शांत राहा, डोक्यावर बर्फ ठेवा”. तोंडात पान, सुपारी, पानमसाला जे हवं ते ठेवा परंतू डोकं शांत ठेवा असं जितेंद्र आव्हाड यांनी पुढे बोलताना सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी एसटी संपावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. मागील ४० वर्षांपासून जेव्हा कधी समस्या निर्माण तेव्हा शरद पवार त्या सोडवण्यासाठी पुढे आले असं सांगत त्यांनी अनेक उदाहऱणं दिली. काही राजकीय पक्षांनी एसटी कामगारांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरलं अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp jitendra awhad appeal muslims to eat pan masala to keep calm sgy

Next Story
नादुरूस्त रस्त्याने घेतले पाच जणांचे बळी; ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
फोटो गॅलरी