राज्यातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन केलेल्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान भुजबळ यांनी हिंदू देवींचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेत भुजबळ यांनी माफी मागून आपलं विधान मागे घ्यावं असं म्हटलं आहे. भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत असं विधान केलं. यावरुनच भाजपाने हा हिंदू देवी-देवतांचा अपमान असल्याचा दावा करत भुजबळांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> Thackray vs Shinde SC Case: …तर शिंदेच अपात्र ठरतील अन् महाराष्ट्रातील सरकार पडेल; कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू

भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

नक्की वाचा >> मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

“हे तुमचे देव असले पाहिजे…”
“मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं ते हे सगळे इथे आहेत,” असं भुजबळ यांनी मंचावरील महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत म्हटलं. पुढे बोलताना भुजबळ यांनी, “यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> “देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

भाजपाचा हल्लाबोल
भुजबळ यांच्या या भाषणाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने त्यावर आक्षेप घेतला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी भुजबळांनी हे विधान मागे घ्यावं अशी मागणी करतानाच शिवसेनेलाही लक्ष्य केलं आहे. “सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. पण राष्ट्रवादीची ही काय पद्धत आहे? त्याचे नेते म्हणतात देवी देवतांचे फोटो काढून टाका? का काढा?” असा प्रश्न कदम यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“उद्या हेच लोक म्हणतील मंदिरांची काय गरज? ती सुद्धा पाडून टाका”
“हिंदूत्वावबद्दल आमच्या देवी-देवतांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना का राग आहे? हिच ती राष्ट्रवादी आहे ज्यांच्याबरोबर पेंग्विनसेनेचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्ते आहेत. काय भूमिका आहे पेंग्विनसेनेची? आज हे लोक म्हणतात देवी-देवतांचे फोटो काढून टाका. उद्या हेच लोक म्हणतील मंदिरांची काय गरज? ती सुद्धा पाडून टाका. असं म्हणणं आहे का राष्ट्रवादीचं? ते म्हणण्यापूर्वीची ही सुरुवात आहे का? नेमकं काय आहे?” असे प्रश्न राम कदम यांनी विचारले आहेत.

नक्की पाहा >> ‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप

“आमच्या देवी-देवतांचा अपमान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. माफी मागत त्यांनी ते विधान मागे घ्यावं,” अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.