आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठं राजकीय स्थित्यंतर घडलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. मग, एकनाथ शिंदेंनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. अलीकडे ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ नावही शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. पण, आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त नांदेड येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा दिलेल्या प्रकट मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “नाव आणि चिन्ह गेलं तरीही उद्धव ठाकरे धैर्याने उभे आहेत. आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं वाटतं. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा एक व्यक्ती उभा राहतो आणि हजारो लोकांना संबोधित करतो, ही सोप्पी गोष्ट नाही. याच्या जागी दुसरं कोण असतं, तर अंथरूण धरलं असतं. पण, हीच खरी कसोटी आहे, एखाद्या व्यक्तीमत्वाची.”

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

हेही वाचा : “शरद पवार ५० वर्षे देशाचे नेते आहेत, पण…”, विजय शिवतारेंनी बारामतीतून डिवचलं

“अनेकजण म्हणतात मी समाजकारणी, राजकारमी, वक्ता, महापौर झालो. पण, कोणती हे सांगत नाही की जेलयात्रा सुद्धा आहे. जे म्हटल्यावर सर्वाना भीती वाटणार. ती काय आरामदायी यात्रा नसते. जेल काय असतं ते अडीच वर्ष आतामध्ये राहिल्यावर कळलं. मात्र, तेव्हा सर्वात जास्त सहकार्य अनेक पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचं मिळालं,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.

हेही वाचा : मुंबईत भाजपाची ताकद वाढली? महापालिकेत शिवसेनेचा महापौर नसणार? संजय शिरसाट म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांना कायम मुख्यमंत्री की विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला आवडेल, असं विचारला असता छगन भुजबळांनी म्हटलं, “देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला आवडणार. कारण, ते विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करतात.”