गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. कर्नाटकमधील कन्नड रक्षण वेदिकेसह इतर काही संघटनांनी महाराष्ट्राविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही कर्नाटकच्या काही वाहनांना काळं फासून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हा वाद आता आणखी पेटताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकारकडून आक्रमक भूमिका घेतली जात असताना महाराष्ट्र सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे राज्यातील जनतेला अपेक्षित नाही. सरकारने काहीतरी ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया वळसे-पाटील यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल

महाराष्ट्र-सीमावादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वळसे-पाटील म्हणाले, “खरं तर, केंद्र सरकारने या प्रकरणात ताबोडतोब लक्ष घातलं पाहिजे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना कर्नाटक सरकारकडून अशा प्रकारची अतिरेकी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला योग्य ती समज दिली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेत असताना, महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या वतीने सरकारने योग्य ती भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे, अशी प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे,” असं वळसे पाटील म्हणाले. कामोठे येथील एका कार्यक्रमानंतर वळसे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader dilip walse patil on maharashtra karnataka border dispute rmm
First published on: 09-12-2022 at 20:33 IST