भाजपाचे माजी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी आपल्यावर झालेली कारवाई कट कारस्थानाचा भाग होती, असा आरोप पुन्हा एकदा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “२०१९ साली जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख दावेदार म्हणून माझे नाव पुढे येत होते.”, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

हे वाचा >> भारतावर कारगिल युद्ध लादणारे पाकिस्तानी माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन

Sonia Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray will enjoy family happiness after election says Dr Dinesh Sharma
सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर पारिवारिक सुख उपभोगता येईल- डॉ. दिनेश शर्मा
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
Chief Minister Eknath Shinde will not allow injustice to be done to Bhavna Gawli says Neelam Gorhe
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावना गवळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही : नीलम गोऱ्हे

मी मुख्यंमत्री पदाचा दावेदार होतो म्हणून..

एकनाथ खडसे म्हणाले, “२०१९ च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच २०१६ रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले गेले. ज्या भूखंडाचा आरोप माझ्यावर ठेवला गेला, त्या भूखंडाशी माझा दुरान्वये संबंध नाही. मी तो जमीन व्यवहार केलेला नाही. मी ती जमीन पाहिलेली देखील नाही. मी फक्त त्या जमीनीबाबत बैठक घेतली होती. त्याचे प्रोसिडिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. केवळ बैठक घेतली म्हणून माझ्या परिवाराची ईडी चौकशी करण्यात आली. त्याआधी लाचलुचपत विभागाने त्याची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीसाठी माझे जावई गेले असता त्याचदिवशी त्यांची अटक करण्यात आली. मला कोर्टाने संरक्षण दिले असल्यामुळे माझी अटक टळली होती.”

हे वाचा >> “राज ठाकरेंनी पत्र लिहिले, मुख्यमंत्र्यांनी फोन केला तरीही..”, संजय राऊत यांचे चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठं वक्तव्य

कसंही करुन मला अटक करण्याचा प्रयत्न

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारले असून तुमचा हेतू शुद्ध नसल्याचे सांगितले आहे. माझ्यावर अटकेची टांगती तलवार ठेवता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने व्यक्त केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. आयकर विभागाने माझी दोन वेळा चौकशी केली, त्यात काहीच आढळून आले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली. त्यातही काही आढळले नाही. तरीही पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. कसंही करुन, काहितरी शोधून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही खडसे यांनी व्यक्त केली.

पोटनिवडणुकीत प्रचारासाठी जाणार

चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजापाचा पराभव होईल. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाला बिनविरोधची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत. मी स्वतः चार ते पाच दिवस तिथे प्रचार करणार असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.