"हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा" मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला| ncp leader jayant patil on rebel MLA upset after cabinet expansion rmm 97 | Loksatta

“हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला!

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांना उपरोधिक टोला लगावला आहे.

“हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला!

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येक नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी होऊन २४ तास उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाहीत. महत्त्वाच्या खात्यांसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरू आता शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

या सर्व राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांना उपरोधिक टोला लगावला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे कमी महत्त्वाची खाती मिळाली किंवा मंत्रीपद मिळालं तर वाईट वाटून घेऊ नये. हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करणं आवश्यक आहे, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “आतापर्यंत शांत होतो, पण…” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड यांचा गंभीर इशारा

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावरून आणि शिंदे गटातील नाराजीबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, “बऱ्याच शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे समर्थक आमदार भारतीय जनता पार्टीसोबत गेले आहेत. त्यामुळे हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करणं आवश्यक आहे. कमी महत्त्वाची खाती मिळाली तर हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करणं अपेक्षित आहे, असं मला वाटतं. त्यात त्यांनी वाईट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. काही आमदारांना मंत्रीही होता नाही आलं तर, तेही वाईट वाटून घेणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे” असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी घोषित होणार? उदय सामंतांनी दिले संकेत

संबंधित बातम्या

शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ आल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मागितली माफी, म्हणाले “तो व्हिडीओ…”
“या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा
“राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले, “अधिवेशनापूर्वी…”
Maharashtra Breaking News Live : मंत्री उदय सामंत यांनी दिली जतमधील नाराज गावांना भेट
“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय
“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा