Lok Sabha Election Result 2024 : देशाच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार आणि कोणाच्या हातात देशाची सूत्रं येणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आतापर्यंत समोर आलेले कल लक्षात घेता राज्यात महाविकास आघाडी महायुतीला मागे टाकून आगेकूच करताना दिसत आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जनतेला जेवढं समजलं, जेवढी आकलनशक्ती होती. ते जनतेने दाखवलं, काय खरं आणि काय खोटं. सोनं कोणाकडे आहे आणि दगड कोणाकडे आहे, हे जनतेने दाखवून दिले. सगळीकडे हेच झाले. तुम्ही जेवढा सत्तेचा माज दाखवला, तेवढा लोकांनी खाली आणला. लोकांनी गद्दारी करणाऱ्यांना चांगली अद्दल शिकवली, याचा आनंद आहे.”

jitendra awhad latest news
“शिंदे सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिला नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “मी अजित पवारांच्या…”
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
devendra fadnavis will continue as dcm
“हा निवडणुकीचा नाही, तर निर्धाराचा अर्थसंकल्प”; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही हवेत घोषणा केल्या नसून… ”
Kiran Mane Post NEET Exam
NEET च्या गोंधळावर संतापले किरण माने, “देश चालवणं म्हणजे मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर…”
Chandrakant Patil
“मी पालकमंत्री असताना अशा चिंताजनक घटना घडल्या नाहीत”, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा रोख कुणाकडे?
eknath shinde criticized thackeray group,
“ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू”; रवींद्र वायकरांवरील आरोपाला CM शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ज्या ठिकाणी…”
What Jitendra Awhad Said?
“विठ्ठलाच्या नावाने दरोडा”, महाआरोग्य शिबीराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप
What Kapil Sibal Said?
ईव्हीएम प्रकरणावर कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया, “राजीव चंद्रशेखर हे एलॉन मस्कपेक्षाही…”

हेही वाचा : Lok Sabha Election Result : मोदींचं ‘नकली संतान’ विधान भोवलं? उद्धव ठाकरेंची भाजपासमोर कडवी लढत

अठराव्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट हे महायुतीमधून तर शरद पवार गट हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागांवर निवडणूक लढविली होती. यापैकी बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय झाला होता. दोन महिन्यांनी उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाले होते.

यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीमध्ये केवळ १० जागा मिळू शकल्या. दोन गटात फूट पडल्यानंतर शरद पवारांकडे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे हे तीन विद्यमान खासदार उरले आहेत. तर अजित पवार गटाकडे सुनील तटकरे हे निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत. महायुतीमधून निवडणूक लढवित असताना अजित पवार यांना मात्र जागावाटपात फार यश मिळाले नाही. रायगड, शिरूर, बारामती आणि धाराशिव हे चार मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आले. त्यातही शिरूर आणि धाराशीवमध्ये त्यांना शिंदे गट आणि भाजपामधून उमेदवार आयात करावे लागले.

बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. या दोन जागांचा निकाल दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.