महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. यातच २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे व पक्षाच्या इतर काही नेत्यांनी थेट ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला अर्थखातं कधी मिळणार? याबाबत चर्चा झाल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली होती.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ६ दिग्गज नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सहा नेत्यांनी अमित शाहांची भेट का घेतली? नेमकं कारण काय? या भेटीत काय चर्चा झाली? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी शाहांची भेट घेतली?

आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ६ दिग्गज नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे या नेत्यांचा सहभाग आहे. या भेटीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहेत.

भेटीचं कारण काय? अर्थखात्याबाबत चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ६ दिग्गज नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट का घेतली? याबाबत वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला अर्थखातं पुन्हा मिळावं, यासाठी या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेत चर्चा केल्याचं बोललं जात आहे.

सुनेत्रा पवारांना डावलून NCP च्या नेत्यांनी शाहांची भेट घेतली?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डावलून अमित शाहांची भेट घेतली आहे का? याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत अद्याप पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.