scorecardresearch

“…तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले”, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.

raj thackeray and amol mitkari
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यातून हिंदू बांधवांना रामनवमी जोरात साजरी करण्याचं आव्हान केलं होतं. आज देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे. पण राज ठाकरे स्वत: विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.

यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा अप्रत्यक्ष उल्लेख तथाकथित ‘हिंदूजननायक’ असा केला आहे. अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदूजननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात , हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा.”

हेही वाचा- “हा त्याच्या पक्षाला एक दिवस आग लावून त्याच भट्टीवर…”, अमोल मिटकरींचा गोपीचंद पडळकरांना टोला!

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, “एकदा राज्य माझ्या हातात द्या, मी सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, हे चालणार नाही. आता मी माहिमचं अतिक्रमण दाखवलं ते महाराष्ट्रातल्या मुस्लीम वर्गाला तरी मान्य आहे का? हा कसला दर्गा आहे? कुणाची समाधी आहे? माशाची समाधी आहे का?”

हेही वाचा- “माझ्या भाषणानंतर उद्या तोंड उचकटू नका, नाहीतर…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा!

“राज्यकर्ते जेव्हा दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात, तेव्हा बाहेरचे लोक काय करतात? हे मी तुम्हाला माहीमचं अतिक्रमणावरून दाखवलं आहे. त्यामुळे माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, यंदा रामनवमी जोरात साजरी करा. ६ जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहा, सावध राहा. एप्रिलमध्ये माझ्या उरलेल्या दोन सभा होणा होत्या, त्या सभाही मी घेणार आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:44 IST

संबंधित बातम्या