scorecardresearch

Premium

Video: यूट्यूबर एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या घरी; जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हा महाराष्ट्राचा अपमान!”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक विधानं केली आहेत.याच्या मते, स्त्रियांना…!”

jitendra awhad tweet elvish yadav
जितेंद्र आव्हाडांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करताना भक्तमंडळी दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले असून अनेक मान्यवरांनी आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यामध्ये राजकीय क्षेत्राप्रमाणेच कला, मनोरंजन क्षेत्रातील मंडळींचाही समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आलेल्या अशाच एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राचा अवमान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

काय म्हणाले आव्हाड?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टबरोबर आव्हाडांनी एल्विश यादवचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यावरून जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “एल्विश यादव सारख्या कुप्रसिद्ध यूट्यूबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे”, असं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Uddhav thackeray on nanded case
नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”
devendra fadnavis sharad pawar ajit pawar
VIDEO : “तपास यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार गट भाजपाबरोबर”, शरद पवारांच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…
devendra fadnavis supriya sule
“मला आनंद आहे की सुप्रिया सुळेंना इतक्या…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “हे त्यांच्या लक्षात येतंय…!”
uday samant uddhav thackeray kiran samant
किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…

“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान…

“या माणसाने महिलांच्याबाबतीत…”

“महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक विधानं केली आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो. बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं असं हा म्हणतो. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकरसाहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराचं जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एल्विश यादव “मुलींनी फार विचार न करता घरातली कामं करावीत, आधीच कमी असणारी बुद्धी फार वापरू नये, फार विचार करू नये” अशी विधानं करताना दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp mla jitendra awhad objects elvish yadav at cm eknath shinde home pmw

First published on: 26-09-2023 at 08:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×