शिंदे गट आणि भाजपामधील वाचाळवीर आमदारांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं होतं. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण करत आहे. माझा नग्न फोटो टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

अनंत करमुसे प्रकरण आणि एक महिलेने विनयभंगाचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच दादा भुसे यांचा व्हिडीओ समोर आल्याने मुख्यमंत्री आता कोणती कारवाई करणार, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Loksatta anvyarth Aam Aadmi Party Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested by ED in liquor scam
अन्वयार्थ: आता राजकीय ‘आप’-घात?
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
Satara, Prithviraj Chavan
शरद पवार यांनी आदेश दिल्यास साताऱ्यातून लढायला तयार – पृथ्वीराज चव्हाण
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

हेही वाचा : “आमच्याजवळही भरपूर बॉम्ब आहेत ते कधी काढायचे आम्ही ठरवू , पण…” देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस दाखल करणार? माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केली. सर्वोच्च न्यायालयात रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली. आता बोला.”

“माझ्यासाठी वकिलांची मोठी फौज आणि पोलिसांची खोटी प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात द्यायला लावली. मी सराईत गुन्हेगार आहे, असे पोलीस सर्वोच्च न्यायालयात पत्र देतात… वाह साहेब आपण मला फाशी देऊ शकत नाही, किंवा मुडदाही पाडू शकत नाही,” असे आव्हाड यांनी म्हटलं.

हेही वाचा : “करोनाला हलक्यात घेण्याची सध्याची…”; राजेश टोपेंचा सल्ला, विद्यमान आरोग्यमंत्र्यांसंदर्भातही नोंदवली प्रतिक्रिया

“माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला, जिने रात्री आपली भेट घेतली, तिच्याविरोधात जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचलंत. आपण मित्र होतो… विसरलात,” असा प्रश्न आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.