वाई: माथाडी कामगारांचे नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचे बंधू ऋषिकांत शिंदें यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे साताऱ्यात राजकीय वर्तुळात चर्चां जोरदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंच्या राजकारणाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

माथाडी कामगार संघटनेत संयुक्तचिटणीस या पदावर ऋषिकांत शिंदे कार्यरत आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी नवी मुंबई येथील घणसोली येथे माथाडी कामगारांच्या सोसायटीच्या निवडणुकीत ऋषिकांत शिंदे यांनी माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व आमदार गणेश नाईक यांच्या पॅनलचा पराभव केला होता. या सोसायटीमध्ये सिडको ने अल्प उत्पन्न गटातील माथाडी कामगारांसाठी ३३ इमारतींमध्ये ३३०० घरे उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे. हे संकुल २२ एकर जागेमध्ये उभे करण्यात येणार आहे. या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या इमारतीची पुनर्विकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची फाईल नगर विकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पोहोचली आहे. त्यामुळे ऋषिकांत शिंदे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.

Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
NCP leader Ajit Pawar group MP Praful Patels former MP Madhukar Kukde joins Sharad Pawar group
प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यावर शरद पवारांचा सर्जिकल स्ट्राईक! बिनीच्या शिलेदाराने…
meeting and entry in ncp party held at sharad pawar modi baug residence
पुण्यातील ‘मोदीबागे’त भेटीगाठी, बैठकांचा धडाका; राज्यातील विविध नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर चर्चा

आणखी वाचा-नाना पटोलेंच्या भावी मुख्यमंत्री फलकावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “मुख्यमंत्री होण्यासाठी आधी…”

माथाडी कामगारांच्या सोसायटीतील विजयानंतर काही सूत्रे ऋषीकांत शिंदे यांच्या हाती आली होती. ऋषीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या संघटनेत प्रवेश केला आहे. यामागे मोठी राजकीय खेळी आहे. यामुळे माथाडी संघटनेत आता नरेंद्र पाटील शशिकांत शिंदे आणि ऋषिकांत शिंदे असे तीन गट पडले असून आहेत. ऋषिकांत शिंदे यांच्या प्रवेशामुळे घणसोली येथील प्रकल्पाला गती मिळणार आहे त्याचा फायदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला होणार आहे.

जावळी तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांचे मोठे वर्चस्व असून अलीकडच्या काळात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.