वाई: माथाडी कामगारांचे नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचे बंधू ऋषिकांत शिंदें यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे साताऱ्यात राजकीय वर्तुळात चर्चां जोरदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंच्या राजकारणाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
माथाडी कामगार संघटनेत संयुक्तचिटणीस या पदावर ऋषिकांत शिंदे कार्यरत आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी नवी मुंबई
माथाडी कामगारांच्या सोसायटीतील विजयानंतर काही सूत्रे ऋषीकांत शिंदे यांच्या हाती आली होती. ऋषीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे
जावळी तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांचे मोठे वर्चस्व असून अलीकडच्या काळात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.