सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मंगळवारी सायंकाळी आमरण उपोषण स्थगित केले. एक महिन्यात जर काम सुरू झले नाही तर पुढचे आंदोलन मंत्रालयासमोर करू असे रोहित पाटील यांनी यावेळी जाहीर केले.तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावाच्या पाण्याच्या मागणीसाठी सोमवार पासून दोघांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या घडामोडी, मुख्यमंत्री शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर , जिल्हाधिकारी उपोषण सोडताना उपस्थित होते. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडले.



