राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सोमवारी लोकसभेत “दत्त दत्ता, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप” अशी मराठी कविता वाचून दाखवली. या कवितेतील केवळ दत्त आणि गाय सोडली तर केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दुधापासून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही, अशी बोचरी टीकाही सुजय विखे पाटलांनी केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी अवघ्या आठ शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्मितहास्य करत “सुजय गोड मुलगा आहे, माझ्या त्याला शुभेच्छा आहेत” असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.

vishal patil marathi news, sangli lok sabha vishal patil latest marathi news
दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम भाजप खासदारांनी केले – विशाल पाटील
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…

सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

“आरोप-प्रत्यारोप होत असताना सुप्रिया सुळेंनी सुंदर उदाहरण दिलं आहे. पण हीच राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. त्यांनी दुधातून निघणारा कोणताही पदार्थ सोडलेला नाही. सत्तेच्या माध्यमातून जे-जे काही काढता येईल, मग तो पैसा असेल, भ्रष्टाचार असेल, वेगवेगळ्या पक्षातून लोकांचं प्रवेश करणं असेल, दबावतंत्र वापरणं असेल, लोकांवर गुन्हे दाखल करून पक्षप्रवेश करून घेणं असो, असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत” अशी टीका सुजय विखे पाटलांनी केली आहे.

हेही वाचा- “…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान

“सुप्रिया सुळे यांनी जी कविता म्हटली, याचा मला आनंदच आहे. पण ती कविता पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसलाच लागू होते. कारण त्यांनी सरकारमध्ये असताना ना दूध सोडलं, ना तूप सोडलं, ना लोणी सोडलं, त्यांनी काहीच सोडलं नाही. त्यांनी गायदेखील सोडली नाही. आम्ही किमान गायीवर तरी टॅक्स लावला नाही, पण त्यांनी गायदेखील सोडली नाही, असं माझं ठामपणे मत आहे” असंही विखे पाटील म्हणाले.