सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व बाबा ग्रुपचे अध्यक्ष नालासाब मुल्ला (वय ५०) याचा शनिवारी रात्री अज्ञातानी गोळीबार करुन खून केला. शंभरफुटी रस्त्यावरील माने चौकात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली असून तणावही निर्माण झाला आहे.मुल्ला यांचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारचा आवाज ऐकून मुल्ला यांचे कुटुंबिय तात्काळ धावले‌. गंभीर स्थितील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालय व गुलाब कॉलनीत गर्दी केली. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

याशिवाय कारागृहातील विहिरी सुस्थितीत आहेत का ? तेथील पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जातात का किंवा स्वच्छ आहेत का ? कारागृहात पर्जन्य जलसंचयन प्रकल्प उपलब्ध आहे का ? याची प्राधिकरणाच्या सचिवांनी पाहणी करावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. कारागृहाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा आकार सिडकोने वाढवला असला तरी कैद्यांना उपलब्ध केले जाणारे पाणी अपुरे असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

माजी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याने यासंदर्भात याचिका केली आहे. कुरूंदकर याच्यावर सहकारी महिला अधिकाऱ्याची प्रेमसंबंधांतून हत्या केल्याचा आरोप आहे. कुरुंदकर हा सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. कारागृहातील कैद्यांना सतावत असलेल्या पाण्याचा मुद्दा त्याने कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या याचिकेद्वारे न्यायालयासमोर मांडला आहे. तसेच कारागृहातील कैद्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याचे आदेश सिडकोला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.

पाणीटंचाईची कबुली; मात्र प्रत्येक कैद्याला १० लिटर पाणी मिळत असल्याचा दावा

गृह विभाग, तसेच कारागृह अधीक्षकांनी या याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात अहवाल सादर करून कारागृहात पाणीटंचाई असल्याची कबुली दिली. तसेच कारागृहातील पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी किमान तीन लाख लिटर पाण्याची आवश्यकता असल्याचेही अहवालात नमूद केले. त्याचवेळी कारागृहाच्या आवारात दोन विहिरी असल्याचा आणि त्यापैकी एक नुकतीच दुरूस्त करण्यात आल्याचा, शिवाय कारागृहात पर्जन्य जलसंचयन प्रकल्प उपलब्ध नसतानाही प्रत्येक कैद्याला प्रत्येकी दहा लिटरपेक्षा जास्त पाणी मिळत असल्याचा दावाही सरकारने केला.